बिहार : मंगळवारी बिहार येथे महिला आणि बाल विकास महामंडळ, युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन आणि प्लॅन इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सशक्त बेटी, समृद्धी बिहार: टूवर्ड्स एन्हांसिंग द व्हॅल्यू ऑफ गर्ल चाइल्ड’ (Towards Enhancing the Value of Girl Child) या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिहार मधील एका महिला आयएस अधिकाऱ्याने असं काही वक्तव्य केलं आहे की, त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! विवाहित-अविवाहित प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार
या कार्यक्रमामध्ये एका मुलीने विचारले सगळे ड्रेस सरकार देते मग सॅनिटरी पॅड का देत नाही का?, असा प्रश्न विचारताच महिला अधिकारी उत्तर देत म्हणाल्या, “आज सॅनिटरी पॅड मागताय उद्या मुलांना कंडोम देखील मोफत द्यावे लागतील”
Supriya sule: शरद पवार पुन्हा सत्तेत येणार? सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या…
यादरम्यान, जनतेच्या मताने सरकार बनतं, असे एका मुलीने म्हणताच महिला अधिकारी म्हणाल्या जर तुम्हाला वाटत असेल तर मतदान करू नका, त्याचबरोबर पुढे त्या म्हणाल्या “तुम्ही पाकिस्तानला जा”असे देखील वक्तव्य त्यांनी केलं आहे. सध्या त्यांचे हे वक्तव्य खूप चर्चेचा विषय आहेत.
सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण; वाचा सविस्तर