काल (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Naga) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) सभा झाली. या सभेला महाविकास आघाडीतीमधील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी सरकारवर वेगेवेगळ्या मुद्द्यांवरून जोरदार टीका केली.
फेसबुकवरील बर्थडे नोटिफिकेशने कंटाळला आहात? ‘या’ पद्धतीने करा नोटिफिकेशन बंद
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मागच्या काही काळामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्याचबरोबर अनेक महापुरुषांचा देखील अवमान केला. त्यावेळी यांच्या सरकारमधील नेत्यांची दातखिळी बसली होती का? त्यावेळी का गौरव यात्रा काढण्यात आल्या नाहीत, असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचबरोबर सावरकरांना आव्हान देण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे का? असं आव्हान देखील अजित पवार यांनी शिंदे-भाजपा सरकारला दिलं होतं.
ठरलं! एकनाथ शिंदे ९ एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार
आता अजित पवार यांच्या आव्हानंतर यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी याला प्रत्युत्तर दिलं आहे. आशिष शेलार म्हणाले, “स्वत:चे काका १५ वर्षे मंत्री आणि मुख्यमंत्री होते. त्यामुळं हे काकांना का विचारलं नाही? , याचं उत्तर अजित पवारांनी द्यावं. मग आम्हाला प्रश्न विचारावा,” असं यावेळी आशिष शेलार म्हणाले.