
Sharad Pawar । यावर्षी कांद्याच्या किमती (Onion Price) चांगल्याच कोलमडल्या आहेत. अशातच केंद्राने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क (Onion export duty) लावले आहेत. त्यामुळे कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीचे नाराजीचे वातावरण पसरले आहे. या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा २,४१० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)
Multibagger Stock । गुंतवणूकदार झाले लखपती! ‘या’ शेअरने दिला जबरदस्त परतावा
परंतु कांदा प्रश्नावरून राजकीय वातावरण चिघळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ४ हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने सरकारने कांदा खरेदी करावा, अशी मागणी केली होती. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संकट काळात पवारांनी कांद्याबाबत असा निर्णय घेतला नसल्याची टीका केली होती. त्यावरून आता शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिले आहे. (Sharad Pawar Replied CM Eknath Shinde)
Sharad Pawar । अजित पवार आमचेच नेते, शरद पवार यांचे मोठे वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
.. तर त्यांचं म्हणणं मान्य करेन
शरद पवार बोलताना म्हणाले की, “मी कृषी मंत्रीपदी असताना कांद्यावर कधी लावला नव्हता. परंतु तुम्ही सत्तेत असताना ४० टक्के कर कसा लावला? तुम्ही तो कर रद्द करा, प्रश्न संपेल. मुख्यमंत्री अर्धवट माहिती देत आहेत. त्यांनी ४० टक्के निर्यात शुल्क वाढवल्याचा खुलासा करावा. जर तो रद्द होत असेल तर त्यांचं म्हणणं मी मान्य करेन,” असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी केले आहे.
“अजित पवार आमचेचे नेते”
पुढे त्यांनी राष्ट्रवादीच्या फुटीवरही भाष्य केले आहे. “अजित पवार हे आमचेचे नेते आहेत. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणता येत नाही,” असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
Agriculture News । शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! शेतीसोबत दुध व्यवसायही धोक्यात