योगगुरू रामदेव बाबा ( Ramdev Baba) त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. आता देखील ते एका नवीन विधानामुळे चर्चेत आले आहेत. लखनौ येथे झालेल्या एका कार्यक्रमात रामदेव बाबा म्हणाले आहेत की, ” मी देशाऐवजी व्यापाराचा विचार केला असता तर, इलॉन मस्क पेक्षा जास्त श्रीमंत झालो असतो.”
नाशिकच्या पान हाऊसमध्ये मिळते चक्क दीड लाखांचे पान! खवय्यांची होते गर्दी
वेद, पुराण, रामायण, महाभारत, भगवद्गीता व पूर्वजांकडून मिळालेल्या ज्ञानातून वापर करून मी पुढे आलो आहे. याचे जर मी पेटंट घेतले असते तर मी इलॉन मस्क ( Elon Mask) पेक्षाही जास्त श्रीमंत झालो असतो. असे देखील रामदेव बाबा यावेळी म्हणाले आहेत.
इलॉन मस्कबाबत बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, आकाशात तुमच्यासाठी जागा बनून जाईल अशी गाडी मी बनवेन, असं इलॉन मस्क म्हणतो. तो टेक्नॉलॉजी बद्दल बोलतो. मात्र आमच्याकडे वेद, पुराण,धार्मिक पुस्तके आणि पूर्वजांचे ज्ञान आहे.
ठाकरे गट व आम आदमी पार्टी एकत्र येणार? उद्धव ठाकरे व केजरीवाल यांनी केलं सूचक वक्तव्य
आम्ही त्यामध्ये संशोधन करून त्याची नोंद केली असती तर, आज इलॉन मस्क पेक्षा देखील जास्त श्रीमंत रामदेवबाबा असता. मात्र ते ज्ञान आम्ही विश्व कल्याणासाठी दिले आहे. असं म्हणत रामदेव बाबा यांनी वेद पुरणांचे महत्त्व पटवून दिले आहे.