मुंबई : राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस (Devendr Fadanvis) यांना मिळाले. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली. तर शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता.
हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहचले आहे. अस असतानाच आता मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. अमित ठाकरे हे पक्ष बाधंणीसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. कोकण दौरा करून आता ते नाशिक (Nashik) दौऱ्यावर गेले आहेत. अनेक युवा राज ठाकरेंसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहेत हे या दौऱ्यामधून दिसून येत आहे.
अमित ठाकरे यांना “सध्याच राजकारण बघता तरुणांनी राजकारणात यावं का? असा सवाल विचारण्यात आला होता यावर त्यांनी मी जर तर मी देखील राजकारणात आलोच नसतो”, अस उत्तर दिलेले आहे. या संकट काळात राज ठाकरे उद्धव ठाकरेंची मदत करणार का? असा प्रश्न देखील त्यांना विचारण्यात आला असून यावर अमित ठाकरेंनी काहीच उत्तर दिलेले नाही. याबाबत राज ठाकरे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी मी सहमत असेल अस अमित ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, मनसेची ताकद अमित ठाकरेंच्या दौऱ्यामुळे वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून भाजप आणि मनसे यांची वाढती जवळिक यामुळे देखील आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत याचे परिणाम दिसतील अस म्हटल जात आहे.