सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच आज ईडीने 10 ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड टाकली. त्याचबरोबर सुजित पाटकर यांच्या घरावर आणि कार्यालयात ईडीने चौकशी केली. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. (Latest News)
अजित पवार यांचा जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर दावा?, राजकीय घडामोडींना वेग
ईडीने केलेल्या या कारवाईमुळे राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. विरोधकांनी याबाबत संताप देखील व्यक्त केला आहे. आता या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना विचारलं असता त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
शरद पवार यांना मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने केला बीआरएस पक्षात प्रवेश
याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, ज्या लोकांवर ईडीच्या चौकशी सुरू झाल्या त्यांच्यावर दबाव आणून भाजमध्ये समावेश करून घेतलं. त्यामुळे अनेक लोक भाजपचे नेते म्हणून एकत्रित आलेले आहेत. उद्या जर राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री झाले तर या सर्वांना जेलमध्ये टाकायला आम्हाला देखील सोपे होईल, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
हे ही पाहा