राज्यात महावितरणने थकीत वीजबिल जमा करून घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काही परिक्षेत्रातील वीज तोडणी देखील करण्यात आली होती. दरम्यान रब्बी पिकांना पाण्याची आवश्यकता असताना वीजबिल तोडणी करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी वीजबिल माफी संदर्भात मोठी घोषणा केली होती.
मोठी बातमी! गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होणार
यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत निशाणा साधला होता. यावर प्रतिउत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी टीका करणाऱ्यांनी जनाची नाही किमान मनाची तरी जाण ठेवावी अशी टीका केली आहे. वीजबिल माफ करा असे मी म्हणलोच नाही तर वीजबिलाबाबत मध्यप्रदेश पॅटर्न (Madhyapradesh Pattern) राबवावा अशी मागणी केली होती असेही ते म्हणाले आहेत.
मुलीच्या जन्मानंतर आलियाला पाहून चाहते खुश; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल
महाविकास आघाडी असताना ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयांची देखील सूट दिली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना वीजबिलावर बोलण्याचा अधिकारच नाही. अस म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना धारेवर धरले. महावितरण ने काढलेल्या पत्रात थकबाकी असलेले बिल तात्पुरते स्थगित केले असून फक्त चालू बिल भरण्यासाठी सांगितले आहे. शेतकऱ्यांकडे कुठल्याही थकीत बिलाची मागणी केली नाही. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पिकांसाठी लागणारी कीटकनाशके आता थेट बांधावर मिळणार