Maratha Reservation । “.. तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल”, सरकारला मराठा महासंघाच्या नेत्याने दिला गंभीर इशारा

".. then Maharashtra will become Manipur", the leader of the Maratha Federation gave a serious warning to the government

Maratha Reservation । नागपूर : दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation Protest) मुद्दा गंभीर होत चालला आहे. मराठा समाज आपल्या मागण्यांवर (Maratha Protest) ठाम आहे. राज्य सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहे. परंतु त्यांना अपयश येत आहे. १४ दिवस उलटूनही यावर अजूनही कोणताच तोडगा निघाला नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आता ओबीसी (OBC) समाज विरोध करू लागला आहे. अशातच मराठा नेत्यांनी इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । “महाविकास आघाडी सरकार पडत होतं तेव्हा…”, अजितदादांनी केला मोठा गौप्यस्फोट

“मराठा समाजाला आरक्षण द्या. अंतिम टप्प्यात आलेल्या लढ्याला जर अपयश आले तर मराठा समाजातील एकाही नेत्यांना निवडून येऊ देणार नाही. रामदास आठवले यांना मदत करू. ओबीसी समाजाला उभं करायचे आणि मराठ्यांमध्ये दोन भाग करून दरी निर्माण करायची हे करू नका. हे तुम्हाला परवडणारं नाही. महाराष्ट्राचा (Maharashtra) मणिपूर (Manipur) करायचा नसेल तर आरक्षण द्या,” असं आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप (Dilip Jagtap) यांनी केलं आहे.

Havaman Andaj । राज्यभर पावसाने पुन्हा घेतली विश्रांती? शेतकरी चिंतेत

“मराठा आरक्षणाचा मुद्दा आता जन्ममरणाचा झाला आहे. आम्हाला 50 टक्क्यातून द्या आरक्षण द्या नाहीतर 50 टक्क्याच्या बाहेरून द्या. पण आम्हाला आरक्षण पाहिजे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आमच्यासोबत दिल्लीला चला. आम्ही तुमची तिकिटे काढतो. ओबीसी नेते उपोषण करतात त्यांचा बोलविता धनी कोण? त्यांच आंदोलन हे राजकीय स्टंट आहे”, असा आरोप देखील दिलीप जगताप यांनी केला आहे.

Thackeray Group । ठाकरे गोटाला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने दिला पदाचा राजीनामा

Spread the love