Site icon e लोकहित | Marathi News

“…तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या” सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

"...then resign from the post of Home Minister" Supriya Sule attacked Fadnavis

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. मागच्या दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) दोन दिवसांपूर्वी दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. त्यांनतर मुंबईतील मालवणीमध्ये (Malvani in Mumbai) देखील दोन गटात राडा झाला. या सर्व राड्यावरून खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी संताप व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सावधान! दिल्लीमध्ये डास मारण्याच्या कॉईलमुळे गेला कुटुंबातील सहा जणांचा जीव

याबाबत माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ज्या पद्धतीने महाराष्ट्रात (Maharashtra) दंगल झालीय. या गोष्टी गंभीर आहेत. त्यामुळे झेपत नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, (The Home Minister should resign) अशी मागणीच सुप्रिया सुळेंनी केली आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

ब्रेकिंग! संजय राऊत धमकी प्रकरणात एकजण पोलिसांच्या ताब्यात

राऊतांच्या धमकीप्रकरणी सुप्रिया सुळेंनी केले ट्विट –

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी (Death threat to MP Sanjay Raut) देण्यात आली आहे. याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, संसदेतील आमचे सहकारी आणि महत्त्वाचे नेते संजयजी राऊत यांना एका व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. देशातील एका लोकप्रतिनिधीला जर अशाप्रकारे धमकी दिली जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे.

मोठी बातमी! ‘त्या’ व्हायरल व्हीडिओप्रकरणी सरपंचाविरोधातच पोलिस तक्रार

केंद्र तसेच महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्याची गरज आहे. याशिवाय लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत, (The criminals have been eliminated) याचा अर्थ गृहखात्याचा वचक,दरारा नाही काय ? केंद्रीय गृहमंत्री अमित जी शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की, यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी. असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

जीवे मारण्याच्या धमकीनंतर संजय राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

ब्रेकिंग! छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा केल्याप्रकरणी दोन मुख्य आरोपींना पोलिसांकडून अटक

Spread the love
Exit mobile version