मुंबई : शिवसेनेने १६ बंडखोर आमदारांना (MLA) अपात्र ठरवावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. येत्या २७ सप्टेंबरला न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. तसेच शिंदे गटातील (shinde group) आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय न्यायालयाकडू अपेक्षित असताना दुसरीकडे धनुष्यबाण हे निवडणूक (Election) चिन्ह नेमकं कुणाचं? या वादावरही निर्णय येण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले, तर पुढे काय घडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Sanjay Raut: ‘या’ तारखेला राऊतांच्या जामिन अर्जावर होणार सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडत आहेत. शिवसेनेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या सूचीचा संदर्भ देत “शिवसेनेमधून शिंदे गट बाहेरच पडल्याचं मान्य करत नसेल तर त्यांनी व्हिपचं पालन करुन बैठकीला हजेरी का लावली नाही”, असा सवाल देखील उपस्थित केला आहे. दरम्यान सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी सुनावणीच्या अनुषंगाने एका ट्विट केलं असून या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे.
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी मिळणार ‘इतके’ अनुदान
नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?
राज्यात काय घडणार? याची चर्चा सुरू झालेली असताना जर सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले, तर पुढच्या १० दिवसांत राज्यातलं सरकार कोसळेल, असं भाकित आमदार अमोल मिटकरींनी केलं आहे. ट्वीटमध्ये मिटकरी म्हणाले की, “उद्या १६ आमदार अपात्र ठरल्यास हे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल..न्यायदेवता न्याय देईलच.”
Rashmika Mandana: रश्मीकाने तिच्या चाहत्याची केली ‘ही’ विचित्र मागणी पूर्ण, व्हिडीओ झाला व्हायरल