मागील अनेक दिवसांपासून ठाकरे गट व शिवसेनेत वाद सुरू आहेत. शिवसेना कुणाची ? व धनुष्यबाण कोणाला मिळणार हा वाद नुकताच निवडणूक आयोगाने मिटवला असून शिवसेना पक्षाचा दावा व पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे. दरम्यान सत्तासंघर्षाचा वाद अजूनही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. किमान तिथे तरी निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरु आहेत.
या पार्श्वभूमीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट ( Ulhas Bapat) यांनी महत्त्वाचे व मोठे विधान केले आहे. सत्तासंघर्षाबाबतचा निकाल कोणाच्या बाजूने लागू शकतो. यावर उल्हास बापट यांनी आपले मत व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आतापर्यंतच्या अतिमहत्त्वाच्या प्रकरणांमध्ये या प्रकरणाचा समावेश करावा लागेल, कारण या प्रकरणाच्या निकालावरून भारतीय लोकशाहीची दिशा ठरणार आहे. असे उल्हास बापट यावेळी म्हणाले आहेत.
मोठी बातमी! अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला
याआधी राजीव गांधींनी (Rajiv Gandhi) घटनादुरुस्ती करून देशात पक्षांतर बंदी कायदा आणला होता. खरंतर राजकीय भ्रष्टाचारामुळे इतर भ्रष्टाचार निर्माण होतो.असे या कायद्यामागचे लॉजिन असून यानुसार तुम्ही पक्षांतर केले तर अपात्र व्हाल असा तो कायदा आहे. यामुळे कदाचित निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागू शकतो असे उल्हास बापट म्हणाले आहेत.
अन् शेतकऱ्यांनी चक्क टोमॅटो फेकून दिले; कवडीमोल दरामुळे उत्पादक वर्ग चिंतेत!