Sharad Pawar । मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) बंड केल्याने राज्यात खूप मोठा भूकंप आला. अचानक त्यांनी आपल्या ८ सहकारी नेत्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) खूप मोठा धक्का बसला. बंडामुळे पक्षात दोन गट पडले आहेत. निम्म्यापेक्षा जास्त आमदारांनी अजित पवारांची साथ दिली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)
नुकताच वाय बी. चव्हाण सेंटरला शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या हस्ते इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळातर्फे प्रकाशित सहा ऐतिहासिक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी पवार म्हणाले की, राज्य सरकारसोबत बोलणे सध्या आम्हाला अडचणीचे आहे. परंतु त्यातून कधीतरी मार्ग निघेल. जर आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये बदल होईल. हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही, असे पवार म्हणाले.
त्याशिवाय या कार्यक्रमात ‘महाराष्ट्राचे दुर्गवैभव’ या पुस्तकाचे देखील प्रकाशन झाले. या पुस्तकाचा उल्लेख करताना आपण दुर्गवैभवाकडून प्रेरणा घ्यावी. दिल्लीतल्या लोकांना आपण कसे पाणी पाजू शकतो याची प्रेरणा यातून घेतली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Tourist Place । स्वर्गापेक्षा कमी नाहीत ही ठिकाणे, पावसाळ्यात नक्की द्या भेट