मुंबई : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील(gulabrav patil) यांनी मिडियाशी संवाद साधत उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला आहे.शिवाजी महाराजही युद्धात तह करायचे. उद्धव ठाकरेंनी(uddhav Thakarey) थोडा तह केला असता तर ही वेळ आलीच नसती अस गुलाबराव पाटील म्हणाले.
Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांच्यासहीत 13 जणांविरोधात लुकआऊट नोटिस जारी ; देश सोडण्यासही बंदी
ते पुढं म्हणाले की, मी 20 आमदार घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो. त्यांच्याकडे आमदारांची कैफियत मांडली. त्यात दुरुस्ती केली तर बरं झालं असतं असं त्यांना सांगितलं. आणि महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यासोबत सर्वात पहिला गेलेला आमदार मी नाही.कारण 32 आमदार गेल्यानंतर 33 वा आमदार मी आहे.उद्धव ठाकरेंनी जर ऐकल असत तर ही वेळ आलीच नसती.
Eknath Shinde : “मुंबईवर हल्ला करण्याची कोणी हिंमत करणार नाही” – एकनाथ शिंदे
काल आदित्य ठाकरे यांनी जळगावात(Jalgav) पक्षवाढीसाठी दोर्यवर होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले होते की गुवाहाटीला जाऊन गद्दारांना काय मिळालं बाबाजीका ठूल्लू. या टीकेला प्रतिउत्तर देत गुलाबराव पाटील म्हणाले की, अडीच वर्षापूर्वी आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरले असते तर ही वेळ आली नसती. 32 वर्षाचे तरुण होते. ते राज्यभर फिरू शकले असते. हीच अपेक्षा होती. त्या काळातील अपेक्षा ते आज पूर्ण करत आहेत. परमेश्वर त्यांचं भलं करो.ज्या एकनाथ खडसेंनी युती तोडली तुम्ही त्यांच्यासोबत बसता. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी भाजपाशी युती केली मग आम्ही गद्दार कसे? आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत, असंही ते म्हणाले.