महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्ये केल्याने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यानंतर त्यांनी आणखी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य फक्त महापुरुषांविषयीच नाही तर देवांविषयी आहे. पुण्यात राष्ट्रीय युवा दिवसाच्या (Youth Day) निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा नव्या वादात अडकणार आहेत.
आपला कुठलाही देव बॅचलर नाही आपले कुठलेही महापुरूष बॅचलर नाहीत. संसार करून सगळं करता येतं. सेवासुद्धा करता येते. जगात कुठलाही माणूस हिरव्या किंवा निळ्या रक्ताचा नाही. देवाने माणसाला घडवताना कुठलाही भेद न करता सर्वांना सारखंच बनवून पाठवलं. देवाने प्रत्येकाला दोन कान, दोन डोळे आणि समान शरीर दिले आहे. माणसाचा जन्म हा स्पर्मपासून होतो. स्पर्म कुणाला दिसत नाही तो स्पर्म १०० किलोचा माणूस तयार करतो. तो माणूस कसा आहे ? हे ठरवतो. त्या स्पर्ममधून माणूस निर्माण करणारा कुणीतरी आहे ना? सगळी माणसं त्याने बनवली आहेत. असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.
मुंबई महापालिकेमध्ये कोटींचा घोटाळा; आदित्य ठाकरे यांचे शिंदे सरकारवर गंभीर आरोप
आत्ताची मुले एसपी कॉलेजच्या कट्ट्यावर जायला घाबरतात. पूर्वी मुले मुलींची टिंगल करायचे आता मुली मुलांची टिंगल करतात. तसेच ‘हिंदू हा धर्म नाही हा एक विचार आहे आणि हिंदू राजाने कधीही कुठल्या धर्मावर आक्रमण केलेले नाही’. ‘मुघलांनी आपल्या देवांवर हल्ले केले. मात्र आक्रमणापासून वाचवण्यासाठी त्यांच्या मुलीही लपवल्या. मुघलांनी मुलींचा चेहरा कुणी पाहू नये म्हणून घुंगट आणले’ अशी वक्तव्ये चंद्रकांत पाटील यांनी केली आहेत.