जूनमध्ये राज्यात घडलेल्या सत्तासंघर्षासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis:) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. फडणवीस म्हणाले, ज्यावेळी एकनाथ शिंदे बंडखोरी करत सुरतला गेले त्यावेळी उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) सत्तास्थापनेसंदर्भात विचारणा झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर संजय राऊत यांनी देखील पलटवार केला आहे.
“उद्धव ठाकरेच वाघ”, अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा
यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायमच सनसनाटी निर्माण करण्याची सवय झाली आहे. आधीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यामध्ये खूप फरक दिसतोय. त्यांना स्टंट करण्याचा छंद जळला असल्याचं संजय राऊत यांनी म्हंटल आहे.
कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्याने ठेवली ऑफर, “शेतात या आणि पाहिजे तितका कांदा फुकट न्या…”
नेमकं काय म्हणाले होते फडणवीस?
ज्यावेळी एकनाथ शिंदे आमदारांसह सुरतला गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि माझं बोलणं देखील झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “जे झालं ते झालं तुम्ही मुख्यमंत्री व्हा.” मात्र त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो की आता आम्ही खूप पुढे गेलो आहोत. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
भीषण अपघात! विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला, २२ विद्यार्थी जखमी