दहावी व बारावीच्या गुणांवरून करिअरची दिशा ठरत असते. म्हणून या परीक्षांना प्रचंड महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक ( SSC) व उच्च माध्यमिक शिक्षण ( HSC) मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावाची परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत. येत्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात या परीक्षा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
रोहित पवारांची निवड परंपरेला नुकसान करणारी – राम शिंदे
चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 ची बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च दरम्यान होणार आहे. या दोन्ही परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रावर अनुचित व गैरप्रकार घडू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षाकेंद्रावर ( Exam Centre) बैठे पथक पूर्णवेळ थांबणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
Rohit Sharma: रोहित शर्मानं टी20 क्रिकेट सोडायचा निर्णय घेतला?
मागील वर्षी दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये खूप गोंधळ पहायला मिळाले. यावेळी बऱ्याचशा परीक्षा केंद्रावर विषय शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचे निदर्शनास आले. तसेच काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थित बैठकव्यवस्था करण्यात आली न्हवती. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी चार सदस्यांचे बैठे पथक विशिष्ट शाळेत पेपरच्या संपूर्ण वेळेत बसून राहणार आहे. तसेच कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची असणार आहे.
एक लाख रुपये भरून जामीन मिळाला मात्र कोचर दाम्पत्याची आजची रात्र कारागारगृहातच