मागील काही महिन्यांपासून शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज महत्त्वाची सुनावणी होणार होती. मात्र शिवसेना ( Shivsena) कुणाची यावर निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिला नाही. शुक्रवारी, 20 जानेवारीला संबंधित सुनावणी होणार आहे.
Sushant Singh: सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाला पुन्हा एक मोठा धक्का
या सुनावणीच्या वेळी ठाकरे गटाकडून अनिल परब ( Anil Parab) आणि सुभाष देसाई हे उपस्थित होते. दरम्यान शिवसेनेतील फूट म्हणजे निव्वळ कल्पना असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे. यामुळे ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे म्हणत, कपिल सिब्बल यांनी शिवसेनेतील फूट ग्राह्य धरू नये. असे सांगितले आहे.
ब्रेकिंग! शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता? 7 जिल्हा प्रमुखांवर ठाकरे गटाचा आक्षेप
दरम्यान शिंदे गटाच्या याचिकेत अनेक त्रुटी असून शिंदे गटाच्या बाहेर जाण्यामुळे पक्षाच्या स्थितीवर कोणताही परिणाम झाला नाही असा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. तसेच शिंदे गटात जाणारे आमदार उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत. त्यावेळी लोकांनी पक्षाच्या धोरणांना समोर ठेऊन या आमदार खासदारांना मते दिली आहेत. त्यामुळे त्या गटात जाणाऱ्या आमदार खासदारांची संख्या लक्षात घेऊ नये. अशी विनंती कपिल सिब्बल यांनी केली आहे.
मोठी बातमी! लग्नाच्या वरातीतही कोयता गँगने घातला राडा
शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात सादर केलेल्या चार लाख कागदपत्रांची छाननी करावी अशी मागणी यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. यावर शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी आपल्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याचा दावा केला आहे. तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी होईपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई करू नये. असे आवाहन देखील ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे.
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशद! झोपलेल्या नागरिकावर कोयत्याने वार