राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या-मोठ्या हालचाली होत आहेत. नुकत्याच काही पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूका पार पडल्या. अशातच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.4) महाविकास आघाडी आपले उमेदवार जाहीर करणार आहे. यामध्येच आता संजय राऊतांनी एक मोठं विधान केलं आहे.
चित्रपटांनंतर आता गौतमी पाटील राजकारणात येणार? स्वतःच केला याबाबत खुलासा, म्हणाली…
संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही एकत्रित लढणार आहोत. आमचा सर्वांचा एकच राजकीय शत्रू आहे. त्यांचा पराभव झालाच पाहिजे. असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. ते सकाळी माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी व भाजप समोरा समोर लढणार आहेत. कसबा व चिंचवड ( Kasba & Chinchwad Elections) येथील निवडणुका बिनविरोध होतील. अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. या निवडणुकांसंदर्भात काल तिन्ही पक्षांची बैठक पार पडली.
रोहित पवार यांना आवरला नाही हुरडा खायचा मोह; म्हणाले, “थंडी आणि हुरडा हे एक..”
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले की, “पुण्यातील कसबा पिंपरी चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र असणार आहे. आज (दि.4) महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.”
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना समाज द्यावी” – सचिन खरात