
मागच्या दोन तीन दिवसापूर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका टॉकीज या भागात आज आंदोलनाला केले होते. एमपीएससीच्या नवीन अभ्यासक्रमावरून विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. नवीन अभ्यासक्रम २०२३ पासून लागू न करता २०२५ पासून लागू करावा. अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल सरकारने घेत २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम लागू करू असा निर्णय देखील सरकारने घेतला होता.
“मी शिवसेनेची साथ कधीच सोडणार नाही”, पराभवानंतर शुभांगी पाटील यांची प्रतिक्रिया
मात्र मागणी पूर्ण होऊन देखील MPSC चे विद्यार्थी आज पुन्हा एकदा पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन करत आहेत. नवीन अभ्यासक्रम २०२३ पासूनच लागू करावा या मागणीसाठी पुण्यात पुन्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले असल्याची माहिती समोर येत आहे.
ब्रेकिंग! रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाच्या संवाद लेखकाचा भीषण अपघात
आता MPSC च्या विद्यार्थ्यांकडून UPSC च्या धर्तीवर परिक्षा घेण्यात यावी यासाठी पुण्यातील अलका चौकात आंदोलन करण्यात येत आहे. यासाठी अनेक विद्यार्थी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.