मागील काही महिन्यांपासून शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू होते. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून शिवसेना ( Shivsena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला.
MBA चहावाल्याने घेतली 90 लाखांची मर्सिडीज; पाहा VIDEO
त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली. ठाकरे गटाने आज निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका सुप्रीम कोर्टासमोर मांडायचा प्रयत्न केला.
मात्र सुप्रीम कोर्टानं आज याचिका दाखल करून घेतली नाही. त्यावर कोर्टाने ठाकरे गटाला उद्या मेन्शनिंग लिस्ट अंतर्गत येण्यास सांगितले आहे.
पंकजा मुंडेंचा उद्धव ठाकरेंना फोन! राजकीय वर्तुळात रंगल्या नव्या चर्चा