सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. दररोज एक विक्रम टोमॅटो नोंदवत आहे. काही दुकानदारांनी टोमॅटोच्या सुरक्षेसाठी चक्क सुरक्षा रक्षक ठेवले आहेत. सध्या टोमॅटोचे दर खूप वाढलेले आहेत. त्यामुळे दररोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे टोमॅटोची चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावर टोमॅटो संबंधी अनेक मजेशीर व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. (Tomato Rate)
Delhi Crime । महिलेच्या शरिराचे तुकडे करून फेकले पुलाजवळ, धक्कादायक घटनेने दिल्ली पुन्हा हादरली
टोमॅटोला जास्त भाव असले तरी शेतकऱ्यांचा (Farmer) फायदा होत नसल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसापासून होत आहेत. मात्र आता ही गोष्ट खोटी ठरल्याचे आपल्याला दिसत आहेत. एका शेतकऱ्याने टोमॅटोमधून एकाच दिवसात 38 लाख रुपये कमावले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. (Latest Marathi News)
टाईम्स ऑफ इंडियातील एका रिपोर्टनुसार. कर्नाटकमधील कोलार येथील शेतकरी कुटुंबाने एकूण 2000 टोमॅटोच्या पेट्या विक्री केल्या. आणि त्यातून त्यांना एकूण 38 लाख रुपये आले असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाकर गुप्ता असं या शेतकऱ्याचे नाव आहे. ते आणि त्यांचे भाऊ मिळून गेल्या 40 वर्षांपासून जमीन कसत आहेत. त्यांनी एकूण 2000 टोमॅटोच्या पेट्या विक्री केल्या. त्यातून त्यांना एकूण 38 लाख रुपयांची कमाई केली.
हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुन्हा ढगफुटी! मुसळधार पावसामुळे 90 जणांचा मृत्यू
हे ही पाहा –