आपल्या गजब फॅशनमुळे प्रसिद्धीस आलेली उर्फी जावेद ( Urfi Jawed) व भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. उर्फीच्या कपडे न घालण्यावरून चित्रा वाघ यांनी तिच्यावर टीका केली होती. तसेच पत्रकार परिषद घेत ‘असला नंगानाच महाराष्ट्रात चालणार नाही’ असे सांगितले होते तसेच तिला अटक करण्यात यावी अशी पोलिसांकडे मागणी केली होती. दरम्यान आता याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठं वक्तव्य केले आहे.
ग्राहकांच्या खिशाला लागणार मोठी कात्री! सीएनजी दरात होणार वाढ?
अमृता फडणवीस म्हणाल्या, “एक स्री म्हणून उर्फीने जे काही केलं आहे ते काही चुकीचं नाही. तिनं जे काही केलं आहे ते स्वत:साठी केलं आहे”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. सध्या त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवले
एकीकडे चित्र वाघ (Chitra Wagh) उर्फीला कपड्यांमुळे नको ते बोलत आहे तर दुरसीकडे अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी उर्फीला सपोर्ट दर्शवला आहे. यामुळे चर्चाना उधाण आले.
कार्यकर्त्यांनी घातला तुफान राडा; स्वतः गौतमी पाटीलनेच थांबवला कार्यक्रम