महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) सगळ्या जिल्ह्यांमध्ये थोड्याफार फरकाने लागवड केली जाते. विशेष म्हणजे नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांद्याची (Onion) सर्वाधिक लागवड होते. नाशिक जिल्ह्यात जरी कांद्याची लागवड (Cultivation of Onion) केली जात असली तरी कांद्याच्या बाबतीत एक कायमचा ओरड असते. ती म्हणजे कांदा दर कमी असणे. दरवर्षी शेतकरी (farmers) राजा काबाडकष्ट कसून कांदा पिकाचं उत्पादन करतो. परंतु जेव्हा कांदा विकायची वेळ येते तेव्हा कांद्याला कवडीमोल दरात विकावं लागतो. ज्यातून शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी केलेला खर्च सुद्धा निघत नाही.
Arjun Kapoor: मलायकाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन कपूरने शेअर केला रोमँटिक फोटो; पाहा PHOTO
दरम्यान मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात हळूहळू सुधारणा होत होती. कांद्याला थोडाफार चांगला दर मिळत असल्याने शेतकरी बंधूंना थोडा दिलासा मिळत होता. परंतु आता शेतकऱ्यांच्या कांदा पिकाच्या दरवाढीच्या अपेक्षा धुळीत मिळणार असल्याचं दिसत आहेत. दरम्यान आत्ता शेतकऱ्याला कांदा रडवणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
साखर उद्योगाला बुस्ट मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शेतकऱ्यांना दिला विशेष कृती आराखडा
सध्या आपण जर किरकोळ बाजारात असलेला कांद्याचे दर पाहिले तर 40 रुपये प्रति किलोपर्यंत कांद्याची विक्री होत आहे. तर घाऊक बाजारामध्ये कांदा 25 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत कांद्याचे दर आणखी किरकोळ बाजारामध्ये वाढतील अशी शक्यता होती. दरम्यान आता कांदा दर नियंत्रित करण्यासाठी सरकारने बफर स्टॉक मधून कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी काढला आहे. त्यामुळे सहाजिकच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल परंतु शेतकरी बांधवांची जिथे कांदा दरवाढीची अपेक्षा पूर्ण होणार नाही.
येत्या डिसेंबरपर्यंत कांदा आणि डाळींच्या किमती नियंत्रित राहू शकतात. याच महत्वाचं कारण म्हणजे सरकारकडे कांदा आणि डाळीचा पुरेसा साठा शिल्लक आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडे अडीच लाख टनापेक्षा अधिक कांद्याचा साठा आहे. तसेच याव्यतिरिक्त सरकारने 54 लाख टन कांदा राज्यांना पाठवला आहे.
वेलवर्गीय पिकांमधून जास्त उत्पादन हवयं, तर ‘अशी’ घ्यावी काळजी
अवकाळी पावसामुळे खरीप हंगामात उत्पादित होणाऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती आहे. परंतु सरकारकडे कांदा बफर स्टॉक मध्ये भरपूर शिल्लक असल्याने कांदा बाजारपेठेत आवक कमी होणार नाही. तसेच विविध राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेश, मदर डेअरी, सफल, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार यांना या स्टॉकमधून 800 रुपये क्विंटल दराने कांदा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
मोठी बातमी! फटाका स्टॉलला आग लागून दोघांचा मृत्यू
दरम्यान या सगळ्या परिस्थितीमुळे डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याच्या किमती नियंत्रित राहणार आहेत. शेतकऱ्यांचा वाखरित साठवलेल्या कांद्यापैकी निम्मा कांदा देखील यामुळे खराब झाला आहे. त्यामुळे कांद्याचे नुकसान आणि दुसऱ्या बाजूने भावात घसरण अशा पद्धतीचा दुहेरी फटका शेतकरी बंधूंना बसणार आहे.