बिहारमधून (Bihar) सतत धक्कादायक घटना समोर येत असतात. सध्या देखील बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील गोपालगंजमध्येमोठ्या बहिणीच्या लग्नादरम्यान, धाकट्या बहिणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. लहान मुलीच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ही घटना बैकुंठपूर पोलीस ठाण्याच्या खैराआजम पंचायतीमधील दक्षिण बनकटी गावात घडली आहे. मृत्यू झालेल्या मुलीचा नाव नेहा असे आहे. नेहाची मोठी बहीण संध्या कुमारी हिचे लग्न शनिवारी रात्री पार पडले. यांनतर काही वेळातच तिचा मृत्यू झाल्याने तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरी लग्नासाठी आलेले सर्व नातेवाईक अजून बाहेर पडले नव्हते. तोपर्यंतच नेहाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.
घटना घडली अशी की, नेहा कुमारी हापशावर पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्या ठिकाणी पाण्याने भरलेला खड्डा होता यावेळी तिचा पाय घसरला आणि ती त्या पाण्यामध्ये पडली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा लगेचच मृत्यू झाला. यामुळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.