
यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी (Farmers) कापूस लागवडीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला आहे. दरम्यान गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाला. विशेष म्हणजे यावर्षी कापसाला (Cotton) काही दिवस 9,000 ते 10,000 रुपये असा दर (price) मिळत होता. परंतु शेतकऱ्यांचं दुर्दैव म्हणाव लागलं की हा दर जास्त दिवस टिकला नाही. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आत्ता शेतकऱ्यांच्या कापसाला (Cotton) सुरवातीलाच 6000 ते 7000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
संत बाळूमामा नेमके कोण होते? वाचा सविस्तर माहिती
त्यासोबतच परतीच्या पावसामुळे (return rain) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कापूस पिकाचे पहिल्याच पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान उर्वरित कापूस उत्पादनाला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. इतकंच नाही तर नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा झालेला नाही.
नव्या लूकमुळे कतरिना झाली ट्रोल, नेटकऱ्यांनी दिल्या एकशे एक कमेंट्स
दरम्यान अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजारपेठेतील कापसाचे भाव मोठ्या प्रमाणावर खाली आले आहेत. जर कापसाला (Cotton) सुरुवातीला एवढा कमी भाव मिळत असेल तर पुढे काय होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे काही शेतकरी आतापासूनच कापूस साठवून ठेवण्याचा विचार करत आहेत.
पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध हॉटेलला भीषण आग, हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान