दिल्ली : देशातील एका महत्वाच्या व्यक्तीवरच्या आत्मघातकी हल्ल्याचा (Terrorist Attack) होणार होता.पण सुदैवाने हा आत्मघाती हल्ल्याचा पर्दाफाश झालाय. यामुळे देशावरचं एक मोठं संकट टळलं आहे.दरम्यान काही दिवसांआधी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर संशयित बोट आढळली होती. त्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला घडवून आणण्याची धमकी देणारा फोन आला होता. त्यानंतर आता ही आलेली बातमी देखील अत्यंत धक्कादायक आहे.
Onion Rate: कांदा दरातील घसरणीमुळे शेतकरी चिंतेत! वाचा सविस्त बातमी
नेमकी घटना काय घडली?
रशियाच्या (Russia)फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने सांगितले की, रशियाच्या अधिकाऱ्यांनी इस्लामिक स्टेट या दहशतवादी (terrorist) संघटनेचा सदस्य ताब्यात घेतला आहे.चौकशी दरम्यान त्याने सांगितले की , तो भारतातील सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या नेत्यावर हल्ला करण्याची योजना आखत होता.कारण त्याला याद्वारे पैगंबरांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता.
याआधी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लामिक पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून वादंग उठल्यानंतर इस्लामिक स्टेटने भारतभर हल्ल्याची धमकी दिली होती.
इस्लामिक स्टेट खोरासान प्रांताने (IS-KP) याच मुद्द्यावर 50 पानांचा दस्तऐवजही जारी केला होता. त्यानंतर ISIS ची अफगाणिस्तानस्थित शाखा, 10 मिनिटांचा व्हिडिओ जारी केला ज्यात भारत आणि नुपूर शर्मा यांच्या निंदेच्या विधानांना जोडले गेले.
व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की तालिबान हिंदूंना इस्लामिक स्टेटपासून वाचवू शकणार नाही, कारण ते शिया मुस्लिमांनाही वाचवण्यात अपयशी ठरले आहेत. याशिवाय अल-कायदाकडूनही अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या. तेव्हा त्यांनी प्रेषित मुहम्मद यांच्या प्रतिष्ठेसाठी लढण्यासाठी गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्ली येथे आत्मघाती हल्ले करणार असल्याचे सांगितले होते.