मुंबई : प्रसिद्ध टिकटॉक स्टार व भाजपा नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे . आज काळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. दरम्यान सोनाली फोगट आणि तिची आई रात्रीच कॉलवर बोलली अशी माहिती सोनालीच्या बहिणीने दिली आहे.
आईसोबत फोनवर बोलताना सोनालीने जेवणात काहीतरी गडबड असल्याचे सांगितले होते. जेवल्यानांतर मला खूप अस्वस्थ वाटत होत. त्यामुळे सोनाली फोगटचा संशयास्पद मृत्यू असल्याचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे चौकशी करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सोनाली फोगट यांना टिकटॉक (TikTok) स्टार म्हणून ओळखले जायचे. त्यांनी छोट्या पडद्यावरील अनेक सुप्रसिद्ध मालिकांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. सोनाली फोगट सोशल मीडियावर खूप सक्रिय असायच्या. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असायचे. त्यांनी बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या १४ व्या पर्वात देखील सहभाग घेतला होता. त्याचबरोबर २०१९ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये देखील प्रवेश केला.
VIDEO : काला चष्मा या गाण्यावर टीम इंडियाचा धमाकेदार डान्स, व्हिडीओ पाहून चाहते चकित!