
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने (MVA) 2022 च्या सुरूवातीच्या काळात सुपर मार्केटमध्ये वाइन (Wine) विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासंदर्भात खूप महत्त्वाचा आहे अस सांगत महाविकास आघाडी सरकारने हा प्रस्ताव मांडला होता. मात्र, भाजप (BJP)व धार्मिक संघटनांनी हा निर्णय महाराष्ट्राच्या (Maharashtra) संस्कृतीला धरून नाही असं सांगत विरोध केला होता. तसेच आंदोलनंदेखील करण्यात आली होती.
Coriander: बापरे! कोथिंबीरीचे दर कडाडले! मिळतोय ‘इतका’ भाव
दरम्यान आता पुन्हा एकदा या निर्णयाची अंमलबजावणी आताचं सरकार म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadanvis government) करण्याच्या तयारीत दिसत आहे. परंतू या सरकारमध्ये आता मतभेद पाहिला मिळत आहेत. दरम्यान गुरूवारी शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की ” महाविकास आघाडीच्या काळात झालेला जनरल स्टोर्स किंवा मॉलमध्ये वाईनविक्रीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे.”
तर त्यानंतर सुधीर मुनगंटीवार बोलताना म्हणाले की मॉल आणि मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय रद्द करण्यात येणार आहे. तसेच मी फडणवीसांना भेटून या धोरणाच्या ड्राफ्टवर चर्चा करणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नावाखाली वाईन विक्रीचा निर्णय बरोबर नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.
Pakistan: पाकिस्तान कर्णधार बाबर आझमचा रिझवानसोबत विश्वविक्रम, विराट कोहलीला टाकले मागे