राज्यात मोठी तलाठी भरती होणार! राज्य शासनाकडून आले आदेश

There will be a big recruitment in the state! The order came from the state government

राज्यातील तरुण मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. परंतु, ‘जागा कमी आणि उमेदवार जास्त’ यामुळे अनेकांना निराश व्हावे लागत आहे. या विद्यार्थ्यांसाठी राज्यसरकारने ( State Government) आनंदाची बातमी दिली असून शासकीय जागांसाठी मेगाभती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 4,122 पदांसाठी तलाठी भरती होणार आहे. या भरतीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘या’ ठिकाणी शेळ्यांप्रमाणे बोकडही दूध देतात; किंमत ऐकून व्हाल थक्क

काही दिवसांपूर्वी शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( MPSC) लिपिक व टंकलेख पदांसाठी मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आता मान्यता दिली असून राज्यात 4,122 तलाठी व तलाठी संवर्गातील पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये या वर्षाच्या अखेरीस रिक्त होणारी 1012 पदे आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 पदे यांचा समावेश असणार आहे.

सावधान! पुण्यात झिका विषाणूचा शिरकाव; प्रशासनाकडून काळजी घेण्याच्या सूचना

राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी याबाबत आदेश दिले आहेत. मागील आठवड्यात स्वतंत्र पत्रक काढून तलाठी संवर्गातील या रिक्त पदांच्या भरतीसाठी श्रीकांत मोहिते यांनी माहिती दिली आहे. यासाठी राज्यातील 6 विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय माहिती मागविण्यात आली आहे. दरम्यान कोकण विभागात 731, नागपूर विभागात 580, अमरावती विभागात 183, पुणे विभागात 746, नाशिक विभागात 1035 तर औरंगाबाद विभागात 874 पदांसाठी भरती होणार आहे.

आईने पोटच्या मुलाच्या डोळ्यात टाकली लालमिरची पावडर; पाहा VIDEO

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *