पुण्यामध्ये MPSC च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केले आहे. पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. जोपर्यंत लेखी आदेश निघत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं विद्यार्थी बोलत आहेत. त्यांच्या या भूमिकेवर विद्यार्थी ठाम उभा आहेत.
गद्दारांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करा; आदित्य ठाकरेंचे चिंचवड मध्ये आवाहन
दरम्यान, काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील या विदयार्थ्यांची भेट घेतली. या विद्यार्थ्यांचे नेमके काय प्रश्न आहेत याबाबत MPSC च्या विद्यार्थ्यांशी चर्चा देखील केली. त्यांनतर शरद पवार यांनी त्या ठिकाणाहूनच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत संवाद देखील साधला.
संजय राऊत निर्बुद्धपणे बोलतात; देवेंद्र फडणवीस यांची संतप्त टीका
मुख्यमंत्र्यांशी याबाबत फोनद्वारे चर्चा होऊनदेखील हे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. मागच्या दोन दिवसापासून हे आंदोलन चालू असून या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.
“संज्या तू लवकरच सामान्य लोकांकडून फटके खाणार”, निलेश राणेंचे ट्विट चर्चेत