मागील काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर होते. विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) भाजपामध्ये ( BJP) प्रवेश करणार अशा चर्चा सर्वत्र सुरू होत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Prakash Aambedkar) यांनी एक मोठा दावा केला होता. येत्या १५ दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात दोन मोठे बॉम्बस्फोट होतील. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
“…तर मला गुंड होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”; सलमानचे वक्तव्य चर्चेत
दरम्यान, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ‘ शेवटच्या श्वासापर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहू’ असा खुलासा केला. यामुळे सर्व शक्यता व चर्चांना पूर्णविराम मिळाला. यानंतर पत्रकारांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारले. मात्र अजूनही आपण आपल्या मतावर ठाम आहोत. असा दावा त्यांनी केला.
सावधान! तुम्हीही कलिंगडावर मीठ टाकून खाताय का? तर हे एकदा वाचाच
“एखादा मोठा भूकंप येतो, तेव्हा त्याचे छोटे छोटे संकेत दिसायला लागतात. सध्या एक भूकंप होता होता थांबला आहे. मी सध्या यावर भाष्य करणार नाही. पण राज्यात दोन भूकंप होतील या माझ्या विधानावर मी ठाम आहे. सगळंच सांगितलं तर उत्सुकता जाते. त्यामुळे त्यावर मी अधिक बोलत नाही.” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
पुण्यातील बुधवार पेठेचे हे भयानक वास्तव तुम्हाला माहित आहे का? वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टात सुरू असणाऱ्या सत्तासंघर्षावर देखील विधान केले आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी कोर्टाला कुणालाच अपात्र करण्याचा अधिकार नाही. तसेच कदाचित विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईवर असणारी स्थगिती उठवली जाईल. असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
वडील सचिन तेंडुलकरकडून मिळाले अर्जुनला आजवरचे सर्वोत्तम गिफ्ट!