
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अचानक निवृत्ती घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला होता. दरम्यान नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये कोश्यारींनी आपले मौन सोडले असून अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केले आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी आपण महाराष्ट्राचे राज्यपालपद का सोडले याबाबत माहिती दिली आहे.
आदिल खानविरोधात लढण्यासाठी राखी सावंतला दिला ‘या’ राजकीय पक्षाने पाठिंबा
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी असताना उत्तराखंडच्या लोकांसाठी आपण काहीतरी करायला हवे. अशी भावना भगतसिंग कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांच्या मनात निर्माण झाली होती. यासाठी त्यांनी राजकारणातून व राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्याकडे व्यक्त केली होती. दरम्यान आयुष्याच्या उतारवयात आपल्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी मी राज्यपाल पद सोडले असल्याचे भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले आहे.
आदिल खानविरोधात लढण्यासाठी राखी सावंतला दिला ‘या’ राजकीय पक्षाने पाठिंबा
“राज्यातील जिल्ह्यांना भेटी देणारा मी एकमेव राज्यपाल आहे. माझ्या कारकिर्दीत मी अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या व तेथील काही गोष्टी समजून घेतल्या. याकाळात लोकं कोविडचे कारण देऊन घराबाहेर पडत नव्हते. मात्र मी शिवनेरी किल्ल्याला भेट दिली होती, मला कोविड झाला नव्हता.” असे वक्तव्य कोश्यारी यांनी मुलाखती दरम्यान केले. याशिवाय मुलाखती मध्ये राजकीय घडामोडींच्या आकलनाबाबत प्रश्न विचारला असता, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की,” राज्यातील सरकारचे, राजकीय घडामोडींचे आकलन करण्याचे काम राज्यातील जनतेचे आहे.”
ब्रेकिंग! देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोन; उडाली खळबळ