मागील काही दिवसांपासून देशात गुजरात निवडणुकांचा (Gujrat Election 2022) गोंधळ सुरू होता. नुकत्याच या निवडणुका पार पडल्या असून आज या बहुचर्चित निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल लागतोय. यामध्ये आज दुपारपर्यंत तर भाजप 152 जागांसह आघाडीवर होते. त्यामुळे सलग 27 वर्षे सत्तेत असणारे भाजपच पुन्हा सत्तेत येणार अशा चर्चा सर्वत्र सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad Pawar) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्राने गुजरातच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते त्यामुळे हे होणारच होत असे मत मांडले आहे.
राज्यात एकूण 182 कारखाने सुरू, गाळप हंगाम तेजीत; शेतकऱ्यांना होणार फायदा
गुजरात मध्ये भाजपचे सरकार येणार आहे यामध्ये अजिबात दुमत नाही, कारण या गुजरात निवडणूकीमध्ये देशातील सगळी सत्ता वापरली गेली होती. इतकंच नाही तर केंद्र सरकारने गुजरातच्या हिताचे अनेक निर्णय देखील घेतले होते. असे म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारचा गुजरात कडे असणारा कल याकडे लक्ष वेधले आहे. याशिवाय महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा संदर्भ देखील यावेळी शरद पवार यांनी दिला आहे.
भाजपची मोठी घोषणा! ‘हे’ असणार गुजरातचे नवीन मुख्यमंत्री
“मागच्या काळात अनेक महत्त्वाचे आणि मोठे प्रकल्प गुजरातकडे गेले. याचा सकारात्मक परिणाम गुजरात निवडणुकीमध्ये दिसला आहे. गुजरात निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला असला तरी देशातील लोकमत एकाच्या बाजूने नाही.” असे शरद पवार म्हणाले आहेत. यावेळी उदाहरण देताना त्यांनी पंजाब आणि दिल्लीच्या महापालिका निवडणुकांबद्दल सांगितले.