“…म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज”, काय म्हणाले उदयनराजे भोसले?

"…therefore, Chhatrapati Shivaji Maharaj", what did Udayanraje Bhosale say?

आज छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची ३९३ वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठया उत्साहात साजरी होत आहे. आज जयंतीच्या निमित्ताने अनेक शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावर जाऊन वेगेवेगळ्या मोहीमा राबवत आहेत.

४४० व्होल्टचा करंट देण्याच्या त्या वक्तव्यावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले..

या पार्शवभूमीवर सामान्य जनतेपासून ते राजकीय नेते अनेकजण छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी अभिवादन करत आहेत. याच पार्शवभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी देखील ट्विटव्दारे महाराजांना जयंतीदिनी अभिवादन केलं आहे.

कसबा पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकले यांनी केली आगळीवेगळी मागणी; म्हणाले…

ट्विट करत उदयनराजे भोसले यांनी लिहिले की, “छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच. महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे एखाद्या झंझावाताप्रमाणे म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात वसतात. संपूर्ण देशवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा.”

मोठी बातमी! गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक; समोर आली मोठी अपडेट

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *