मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका होते आहे. यावरून रायकीय नेत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील याविषयी एक विधान केलं आहे.
‘अशा’ पद्धतीने करा जनावरांचे पालन, मोठ्या आजारांपासून राहतील दूर
वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातमध्ये गेला हे चांगले झाले नाही. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पामुळे राज्यातील जवळपास दीड लाख लोकांना नोकरी मिळाली असती, पण हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे तुरूणांच्या रोजगाराची संधी गेली आहे. अस रोहित पवार म्हटलं आहे. रोहित पवारांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
त्याचबरोबर रोहित पवार पुढे म्हणाले, 1 लाख 58 हजार कोटींचा हा प्रोजेक्ट गुजरातला जाऊ नये याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. त्याचबरोबर आयएफसी सेंटर हे पूर्वी मुंबई या ठिकाणी होते. पण आता ते गुजरातला हलवण्यात आलं आहे. त्यामुळे ही राज्यातील दोन लाख तरूणांना नोकरी मिळाली असती. त्यामुळे हा देखील प्रकल्प आपल्याला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणावा लागणार आहे. असा देखील उल्लेख रोहित पवारांनी केलाय.
खुशखबर! आता फक्त 750 रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडर ; आजच करा बुकिंग