नुकत्याच पार पडलेली नाशिक पदवीधर निवडणुकीने राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली होती. सत्यजित तांबेनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर करणं, मामा-भाच्यांमधले वाद, तांबेंना पाठिंबा कुणाचा यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं आणि आता त्यांचं निवडून येणं अगदी राजकीय महानाट्याला शोभणारं आहे. दरम्यान या निवडणुकीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघड्यावर पडले आहेत.
‘माझा भाऊ मुख्यमंत्री आहे’ म्हणत तरुणाने दारू पिऊन पोलीस स्टेशनमध्येच घातला राडा
निवडणुकीच्या काळात सत्यजित तांबे आणि काँग्रेस (Congress) यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. निवडून आल्यानंतर सत्यजित तांबेंनी (Satyajeet Tambe) पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. “पक्षाकडे कामाची जबाबदारी मागितली असता, काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांनी वडिलांच्या जागी प्रयत्न करा असा सल्ला दिला होता. दरम्यान वडिलांनीच माघारी घ्यायच ठरवलं. यामुळे मी अर्ज सादर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्त्वाकडून दोन एबी फॉर्म चुकीचे पाठविण्यात आले होते.” असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे.
मोठी बातमी! अदानींची शेअर मार्केट मधून हाकलपट्टी; वाढते नुकसान पाहून NSE ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
इतकंच नाही तर काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठी माझ्याविरुद्ध षडयंत्र रचण्यात आले होते. असे देखील सत्यजित तांबे म्हणाले आहेत. परंतु, काँग्रेस पक्षाने सत्यजित तांबेंचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘तांबे यांनी केलेले आरोप गंभीर असून याबाबत चौकशी व्हायला हवी.’ असे वक्तव्य केले आहे. याशिवाय काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सत्यजित तांबेंच्या आरोपांना फेटाळत, तांबे यांना योग्य अर्ज दिले होते. त्याच्या नक्कल प्रती आपल्याकडे आहेत. असे स्पष्टीकरण दिले आहे.
‘देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे’, सत्यजीत तांबेंच वक्तव्य चर्चेत