
Milk Cow Species । भारत हा कृषिप्रधान देश आहे. अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय (Dairy business) करतात. सध्या या व्यवसायाचा झपाट्याने विस्तार होऊ लागला आहे. हा व्यवसाय करताना योग्य नियोजन गरजेचे आहेत. तरच तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. जर तुम्हाला या व्यवसायात बक्कळ कमाई करायची असेल तर तुम्ही योग्य त्या गायींची निवड करावी. (Latest Marathi News)
Highway Accident । भीषण अपघात! कार-ट्रकच्या धडकेत ४ ठार तर ३ गंभीर जखमी
विशेष म्हणजे गायींच्या संगोपनासाठी सरकारकडून मदत मिळणार आहे. त्यामुळे या व्यवसायात तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागणार नाही. अशा काही गायींच्या प्रजाती आहेत ज्या दिवसाला 50 लिटरपेक्षा जास्त दूध देतात. जर तुम्ही या गाई पाळल्या तर महिन्याभरात तुम्हाला खूप मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.
लाल सिंधी गाय
लाल सिंधी गाय सिंध प्रांतात पाहायला मिळते. परंतु अलीकडच्या काळात ही गाय केरळ, हरियाणा, कर्नाटक, पंजाब आणि ओडिशामध्येही मोठ्या प्रमाणात पाळली जाते. जर तुम्ही या गाईची योग्य ती काळजी घेतली तर ती दिवसाला एकूण 40 ते 50 लिटर दूध देऊ शकते. (Red Sindhi cow)
साहिवाल गाय
उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये साहिवाल गाय जास्त प्रमाणात आढळेल. ही गाय दिवसाला 10 ते 15 लिटर दूध देते, परंतु या गायीची देखील तुम्ही विशेष काळजी घेतली तर ती दिवसाला 30 ते 40 लिटर दूध देऊ शकते. या गायीची खासियत सांगायची झाली तर ती कमी जागेतही ठेवता येते. (Sahiwal cow)
गीर गाय
ही देशातील सर्वात जास्त दूध देणारी गाय आहे. ही गाई दिवसाला 12 ते 20 लिटर दूध देते. परंतु तुम्ही या गायीची योग्य काळजी घेतली तर ही गाय दिवसाला 50 ते 60 लिटर दूध देऊ शकते. (Gir cow)
Havaman Andaj । राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार! ‘या’ परिसरात कोसळणार अतिमुसळधार पाऊस
योग्य संगोपन
वास्तविक गायींच्या योग्य संगोपनातून पशुपालकांना चांगला नफा मिळत आहे. परंतु, राज्यात सध्या दुधाच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय करत असताना तंत्रज्ञानासोबतच ज्ञान देखील असणे गरजेचे आहे. जर तुम्ही गाईच्या चांगल्या दूध उत्पादनाक्षमता असणाऱ्या या जातींचे संगोपन केले तर तुम्हाला या व्यवसायात नफा येईल.
Maratha Reservation । मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार का? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत