‘स्वतःचे घर’ हे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. मात्र सध्याच्या वाढत्या महागाईमुळे घर घेणे तितके सोप्पे राहिले नाही. अशावेळी घर बांधण्यासाठी लोक गृहकर्ज घेतात. मात्र गृहकर्ज (Home Loan) घेताना व्याज जास्त प्रमाणात द्यावे लागते. यामुळे लोकांना मोठा आर्थिक फटका बसतो. मात्र काही अशा बँका आहेत, ज्या गृहकर्ज महाग झाले तरी इतर बँकांच्या तुलनेत स्वस्त गृहकर्ज देतात.
गृहकर्ज घेताना खालील गोष्टी लक्षात घेतात
१) गृहकर्जामध्ये ईएमआय (EMI) आणि व्याजदर ( Interest Rate) ठरवण्यात अनेक घटक भूमिका बजावतात.
२) गृहकर्ज देताना वय, पात्रता, तुमच्या घरातील आश्रित सदस्यांची संख्या, तुमच्या जोडीदाराचे उत्पन्न, तुमची मालमत्ता याचा विचार केला जातो.
३) याशिवाय दायित्वे, बचतीचा इतिहास आणि नोकरीची सुरक्षितता यांचा सुद्धा बँका विचार करतात.
Uorfi Javed । मोठी बातमी! उर्फीने गरजू लोकांना वाटल्या ५०० च्या नोटा; व्हिडीओ होतोय व्हायरल
स्वस्त गृहकर्ज देणाऱ्या बँका
१) इंडसइंड बँक ग्राहकांना किमान ८.४ टक्के आणि कमाल ९.७५ टक्के गृहकर्ज देते.
२) इंडियन बँक किमान ८.४४ टक्के आणि कमाल ९.१ टक्के गृहकर्ज देत आहे.
३) HDFC बँक किमान ८.४५ टक्के आणि कमाल ९.८५ टक्के गृहकर्ज देत आहे.
४) UCO बँकेत गृहकर्जावरील किमान व्याजदर ८.४४ टक्के आणि कमाल व्याज १०.३ टक्के आहे.
५) बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना ८.५ % ते १०.५ % दराने गृहकर्ज देत आहे.
६) बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांना किमान ८.६ टक्के आणि कमाल १०.३ टक्के गृहकर्ज देत आहे.
७) युनियन बँक ऑफ इंडियामध्ये गृहकर्जाचा किमान व्याजदर ८.७५ टक्के आणि कमाल व्याजदर १०.५ टक्के आहे.
८) IDBI मधील गृहकर्जाचा व्याजदर ८.७५ टक्क्यांवरून १०.७५ टक्क्यांवर जातो.
९) पंजाब नॅशनल बँकेत गृहकर्जाचा व्याजदर ८.८ टक्के ते ९.४५ टक्के आहे.
१०) कोटक महिंद्रा बँकेचा व्याजदर ८.४५ टक्के ते ९.३५ टक्के आहे.
Aakash Thosar | सैराटमधील परश्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, “फक्त गरजेपूरत…”