पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना बसणार मुसळधार पावसाचा तडाखा, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Pune Rain

अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाला अखेर सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराजासह सर्वजण सुखावले आहेत. पुणे (Pune), मुंबईसह (Mumbai) अनेक जिल्ह्यात पावसाने बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. अशातच हवामान खात्याने (IMD) पुण्यासह इतर जिल्ह्यांना इशारा दिला आहे. आज हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांचा जवळचा आणि विश्वासू पदाधिकारी शिंदे गटात जाणार? चर्चांना उधाण

त्याशिवाय रत्नागिरी, पालघर, सिंधुदूर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून येलो अलर्ट जारी केला आहे. तर फक्त आज रायगड जिल्ह्यातच ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच काल मुंबईत पावसाने चांगली हजेरी लावली होती. परंतु आज हवामान खात्याने या जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. (Rain in Maharashtra)

“फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा”, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

दरम्यान, राज्यातील ठराविक ठिकाणीच पावसाने हजेरी लावली असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अजूनही पाठ फिरवली आहे. पाऊस न पडल्याने पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. राज्यात जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर शेतकऱ्यांवर मोठे संकट येऊ शकते.

सर्वात मोठी बातमी! मंत्रिमंडळाच्या बैठकीत १९ हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *