गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. तरुणांपासून महताऱ्यांपर्यंत अनेक गौतमीचे चाहते आहेत. गौतमीचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहे. त्याचबरोबर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात धिंगाणा करतात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तरुणांचा गोंधळ हे समीकरण काही आपल्यासाठी नवीन नाही. गौतमीच्या कार्यक्रमात सतत गोंधळ होतच असतो. त्यामुळे गौतमी सतत चर्चेत असते.
सर्वात मोठी बातमी! राज्यात अवकाळी-गारपिटीचा तडाखा, नद्या दुथडी भरून वाहिल्या
गौतमीवर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली जाते. मागच्या काही दिवसापूर्वी गौतमी पाटील हिच्यावर इंदुरीकर महाराज यांनी जोरदार टीका केली होती. गौतमी ३ गाण्यांना तीन लाख रुपये घेते अशी टीका इंदुरीकर महाराजांनी केली होती. दरम्यान आता पुन्हा ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमीवर टीका केली आहे.
बिबट्याच्या झडपेत ७ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू!
एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्राची कला नेमकी कुठे चालली आहे? महाराष्ट्राचा बिहार करायचाय का? असा सवाल रघुवीर खेडकर यांनी उपस्थित केला आहे. सध्या त्यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे यामध्ये ते गौतमीवर टीका करताना दिसत आहेत. ते गौतमीवर टीका करत म्हणाले, “100 कलावंतांच्या तमाशाला दोन लाख रूपये मानधन मिळेना. या चार पाच पोरींना खोऱ्याने पैसा मिळतोय. महाराष्ट्राच्या लोककलेची गौतमी पाटील करू नका, असं ते यावेळी म्हणाले आहेत.
‘नॉट रिचेबल’ असल्याच्या बातम्यांवर अजित पवार यांनी दिल स्पष्टीकरण; म्हणाले…