
मुंबई : रताळे (Sweet potatoes)सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी(health) खूप फायदेशीर आहे.रताळामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि फायटोन्यूट्रिएंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच रताळामध्ये पिष्टमय पदार्थ म्हणजे प्रोटिन्सचे (proteins)प्रणाम जास्त असते त्यामुळे आपले शरीर निरोगी (healthy)राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते. रताळ्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. चरबी, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅलरीज आणि फायबर चे भरपूर प्रमाणात असते.विशेष म्हणजे रताळ्याच्या सेवनाने हाडे मजबूत होण्यासही मदत होते.
रताळ्याचे फायदे –
1) मधुमेह नियंत्रणात
रताळे खाल्ल्याने मधुमेहही नियंत्रणात राहतो. रताळात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक जास्त प्रमाणात असते, परंतु ते अॅडिपोनेक्टिन प्रदान करतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते शिवाय आपले हृदय सुद्धा निरोगी ठेवण्यास मदत करते.म्हणून रक्तातील साखर नियंत्रणात (Sugar under control) ठेवण्यासाठी रताळे उकडून त्याचे सेवन करा.
2) रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत
रताळामध्ये अनेक पोषक तत्वे आढळून येतात यामध्ये फायबर, खनिजे आणि विविध जीवनसत्त्वे जे की आपल्या आरोग्याला जास्त फायदेशीर असतात. जे रताळे दिसायला अगदी जांभळ्या रंगाचे असतात ते सर्वात जास्त आरोग्यासाठी फायदेशीर असतात.त्यामुळे मुबलक जीवनसत्त्वे मिळाल्यामुळे आपले शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते शिवाय आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढून अनेक आजारांपासून आपला बचाव होतो.
3) वजन कमी करण्यास मदत
जर का आपल्याला वजन कमी करायचे असेल तर डॉक्टर आपल्याला रताळाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. कारण रताळामध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते सोबत फायबर सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने रताळे खाल्ल्यावर आपली भूक शमवते आणि आपले वजन कमी किंवा नियंत्रणात राहण्यास सुरुवात होते.
4) हाय बीपीमध्ये आरामदायी
रताळेमध्ये आढळणारे पोटॅशियम बीपीची समस्या दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे रताळे सेवन बीपी असणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त मानले जाते. मात्र तरीही खबरदारी म्हणून एकदा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
डोळ्यांसाठी फायदेशीर
रताळाचे सेवन केल्यावर तुमच्या डोळ्यांना बीटा केरोटीन मिळते आणि डोळ्यासंबंधीत असलेले आजार नाहीसे होतात.