केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर (Budget 2023) केला आहे. यामध्ये त्यांनी विविध महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या असून नवीन कर संरचना देखील जाहीर केली आहे. यामध्ये सर्वसामान्यांसाठी काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत.
पॅनकार्ड संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा
या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये मोबाईल फोन, हिऱ्यांचे दागिने, टीव्ही पॅनल, इलेक्ट्रॉनिक वाहने, सायकल या वस्तू स्वस्त होणार आहेत.
सिगारेटही महागली, यंदाच्या बजेटमध्ये ‘या’ गोष्टी महागल्या; वाचा सविस्तर
अर्थसंकल्पात भर देण्यात आलेली 7 उद्दिष्टे
1) पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक
2) विकासपट सर्वसमावेशक करणे
3) खऱ्या अर्थाने क्षमतांचा वापर करणे
4) हरितविकास ( Green Development)
5) युवकांचे सामर्थ्य
6) आर्थिक क्षेत्र उंचावणे
7) सर्व व्यक्तींना लाभ देणे
हिरेही झाले स्वस्त पण सोने चांदी महागले! यंदाचा अर्थसंकल्प वाचा एका क्लिकवर
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
1) अगामी काळात कृषी क्षेत्रासाठी डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अॅग्रीकल्चर अॅक्सिलरेटर फंड उभारण्यात येणार आहे. यामुळे शेती स्टार्टअपना प्रोत्साहन मिळणार आहे.
2) भरड धान्याचे उत्पादन, त्याची विक्री आणि संशोधन यासाठी सरकार पुढाकार घेणार.
3) देशात नवीन 157 नर्सिंग कॉलेज स्थापन होणार.
4) लहान व किशोरवयीन मुलांसाठी नॅशनल डिजिटल लायब्ररी स्थापन होणार.
5) जेष्ठ नागरिकांना बचत योजनेवर सुविधा मिळणार
6) पंतप्रधान आवास योजनेचा निधी 66 टक्क्यांनी वाढला.
7) पायाभूत सुविधांसाठी निधीमध्ये 33 टक्क्यांनी वाढ
8) देशात 50 नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहेत.
मोठी बातमी! दुगधव्यवसायसाठी अर्थसंकल्पात २० लाख कोटींची तरतुद