Site icon e लोकहित | Marathi News

‘या’ गोष्टी महाराष्ट्राच्या गौरवतेला शोभणारं नाहीत, शरद पवारांची गंभीर प्रतिक्रिया

'These' things do not suit the glory of Maharashtra, Sharad Pawar's serious reaction

मागच्या काही दिवसांमध्ये कोल्हापूरमध्ये ज्या घटना घडल्या त्या अत्यंत हृदयद्रावक होत्या. सोशल मीडियावर या घटनेचे भरपूर व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. या घटनेची सुरुवातच सोशल मीडियावरून झाली होती. सोशल मीडियावर औरंगजेबसंदर्भात (Aurangzeb) आक्षेपहार्य पोस्ट केल्यामुळे ही संपूर्ण दंगल घडून आली होती. त्यामुळे कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना प्रचंड आक्रमक झाली आहे. 7 जूनला या हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूरमध्ये मोर्चा काढला होता. परंतु त्या मोर्चाला वेगळेच वळण लागले. त्यामुळे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे.

आनंदाची बातमी! मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान खात्याने दिली माहिती

कोल्हापूरमध्ये जे काही घडत आहे ते महाराष्ट्राच्या लौकिकतेला लाजवणारे आहे. थोरामोठ्यांची अवघी हयात महाराष्ट्रातच गेली आणि त्याच महाराष्ट्रात आता या सर्व गोष्टी घडत आहेत. राज्यातील सर्वसामान्य लोक या ठिकाणी येतात आणि हे सर्व प्रकार घडतात. हे सर्व कुणीतरी जाणून बुजून करत आहे. सर्वसामान्य माणसांनी कायदा हातात घेणं हे योग्य नाही. तरीदेखील असे प्रकार का घडत आहेत आणि या मागचा कोण सूत्रधार आहे. जो जाणीवपूर्वक या सर्व गोष्टी घडवून आणत आहे. असं शरद पवार म्हणाले आहेत.

भीषण अपघात! कंटेनर-ओम्नीची धडक, दोन महिलांचा जागीच मृत्यू

या सर्व गोष्टींचा सर्वसामान्य माणसाच्या (Common People’s Life) जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी हे असं घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. आपण सगळ्यांनीच या यंत्रणेला सहाय्य केले पाहिजे. तरच ही अवस्था बंद होण्यास मदत होईल, असं देखील शरद पवार म्हणाले आहेत.

भटक्या कुत्र्यांना टाकले प्रेयसीच्या शरीराचे तुकडे, मीरा रोडमधील घटनेबाबत समोर आली धक्कादायक माहिती

कोल्हापूर (Kolhapur) असो की अहमदनगर (Ahmednagar) असो सगळ्यांना सामाजिक जाणिवतेचं भान असलं पाहिजे. या जिल्ह्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या या भागांमध्ये अशा दंगली न घडता शांतता निर्माण झाली पाहिजे. शाहू महाराजांचा (shahu Maharaj) आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामान्य माणसांच्या हिताची जपणूक केली पाहिजे. मला खात्री आहे जर कोणी चुकीचं वागत आहे तर त्याला बहुसंख्य समाजाने संयम दाखवत तर राज्य सरकारने सामंजस्य दाखवत शांतता प्रस्थापित केली पाहिजे. असं शरद पवार म्हणाले आहेत.

तिकडे मोठ्या बहिणीचं लग्न झालं अन् इकडे बारक्या बहिणीसोबत घडलं भयानक, वाचून बसेल धक्का

Spread the love
Exit mobile version