Site icon e लोकहित | Marathi News

महाराष्ट्रातील ‘या’ गावात शेतीला बांधच नाहीत; सगळीकडे रंगलीय जोरदार चर्चा

'These' villages in Maharashtra have no barriers to agriculture; There was a lot of discussion everywhere

गावाकडील लोकांमध्ये भांडण होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे शेतीचे बांध. शेतीच्या बांधावरून लोकांमध्ये सतत वादविवाद चालू असतात. मात्र सध्या अशी एक बातमी समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सध्या महाराष्ट्रातील एका गावाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या गावात शेतीला बांधच नसल्यामुळे याची जोरदार चर्चा रंगली आहे.

“गोपीचंद पडळकरांना चोपल्याशिवाय राहणार नाही” राष्ट्रवादीच्या ‘या’ महिलेचा गंभीर इशारा

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मंगळवेढा शिवारात आज देखील जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला बांध नाही. सध्या ही चर्चेचा विषय ठरली आहे. या ठिकाणी आज देखील शेतीला बांध न घालण्याची शेकडो वर्षाची अनोखी परंपरा आजही कायम आहे.

आमदार बच्चू कडूंचा अपघात की घातपात? राष्ट्रवादीच्या आमदाराने उपस्थित केला प्रश्न

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मंगळवेढा शिवारात शेतीच्या बांधावरून कधी वादच होत नाहीत. हे शहर संत दामाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असणारे शहर आहे. या ठिकाणी तुम्हाला शेतीला बांध नावाचा प्रकारचं दिसणार नाही. या ठकाणी जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला बांध नाही.

मोठी बातमी! कोयता गँगमधील मुख्य आरोपीला अटक

Spread the love
Exit mobile version