श्रीगोंदा : मागच्या तीन चार दिवसांपासून राज्यभरात परतिचा पाऊस जोरदार पडला (rain) आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर स्त्याच्या कडेला देखील पाण्याचे प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहतांना दिसत आहे.
आज वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस, जाणून घेऊया आजच महत्व
यामध्येच आता श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील तांदळी दुमाला – टाकळी रोड वरती जांजाळी नदी तुडुंब भरून, पुलावर खूप पाणी आल्यामुळे पुलावरील कठड्या देखील तुटून गेल्या आहेत. यामुळे जाण्यायेण्यासाठी रास्ता बंद झाला असून दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे.
धक्कादायक घटना, चेंबरमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू
दरम्यान शेतकऱ्यांची तोंडाशी आलेली पिके पाण्यात बुडाली आहेत यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. कांदा, मका, कपाशी, यासारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
बापरे! तब्बल ३५० हून अधिक मुलींशी संजय दत्तचे होते शारीरिक संबंध, समोर आले धक्कादायक कारण