पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रचार सभांचे आयोजन केले जात आहे. दरम्यान काल पिंपळे निळख येथील सभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपवर जोरदार टीका केली आहे. निवडणूकीमध्ये भाजप कुठल्याही स्तराला जाते. गंभीर आजारी असताना देखील खासदार गिरीश बापट यांना ऑक्सिजनची नळी लावून प्रचारात आणले. त्यांनी जनाची नाही मनाची तरी बाळगायला हवी होती. अशा शब्दांत अजित पवारांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत.
कसबा पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकले यांनी केली आगळीवेगळी मागणी; म्हणाले…
राज्य व विधानपरिषदेसाठी आमदार मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप गंभीर आजारी असताना देखील त्यांना मतदानासाठी ऍम्ब्युलंन्स मधून आणण्यात आले होते. तेव्हा एक-दोन मतांनी काही फरक पडला असता का? किती स्वार्थी असावे एखाद्याने. स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याच्या जीवाकडे देखील न पाहणारी माणसं आहेत ही ! असे म्हणत स्पष्ट शब्दांत अजित पवारांनी भाजपचे वाभाडे काढले आहेत.
४४० व्होल्टचा करंट देण्याच्या त्या वक्तव्यावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले..
चिंचवड विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी ‘माणसे जोडायची असतात, तोडायची नसतात’ असा टोमणा देखील भाजपला दिला आहे. दरम्यान पिंपरी विधानसभा मतदार संघाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असून यासाठी भाजप मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी महाविकास आघाडी देखील प्रचारात आघाडीवर आहे.
मोठी बातमी! गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक; समोर आली मोठी अपडेट