
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प काल (दि.1) जाहीर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. सामन्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetti) यांनी या अर्थसंकल्पावर एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
“कोयता गँगला पकडा, बक्षीस मिळवा”, कोयता गँगला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची फिल्डिंग
अर्थसंकल्प 2023-24 ( Budget 2023-24) वर आपण समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. यामध्ये देशातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावर शेतकरी नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.
राखी सावंतचे लग्न धोक्यात; स्वतःच केला खुलासा, म्हणाली…
2022 साली शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असा गाजावाजा केंद्र सरकारने केला होता. यातून त्यांनी शेतकऱ्यांना क्रांतीचे स्वप्न दाखवले. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न तर दुप्पट झालेच नाही. परंतु, शेतीचा उत्पादन खर्च दुप्पट झाला. ही केंद्र सरकारची किमया आहे. देशात अजून साखर कारखान्यांचे डिजीटल करण्याचे धोरण अंमलात आणले नाही, तर मग शेती क्षेत्रात डिजीटल क्रांती काय येणार? शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीरच आहे. असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.
अर्थसंकल्प सादर होताच विवेक अग्निहोत्रींची दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
या अर्थसंकल्पात सरकारने रासायनिक खतांच्या किंमतींना आळा घालण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच डेअरी व पोल्ट्री व्यवसायासाठी देखील अगदी तोकडी तरतूद आहे. तसेच नवीन अर्थसंकल्पात शेती, शेती पूरक उद्योग, ग्रामीण विकास, पशुसंवर्धन यांना नवीन असे काहीच मिळाले नाही. अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा; मात्र पीएम किसान योजनेची रक्कम वाढली का? जाणून घ्या सविस्तर