चोर तो चोर वरून शिरजोर! वाहतूक पोलिसांनी कारवाई केली म्हणून चालकाने भर रस्त्यात पेटवली दुचाकी

Thief to Thief Shirjor! As the traffic police took action, the driver set the bike on fire on the road

वसई : वाहन चालवणाऱ्या प्रत्येकालाच वाहतुकीचे नियम पाळावे लागतात. जे लोक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. ( Traffic Police) बऱ्याचदा वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना नियम तोडण्यावरून टोकले की, चालक वाद घालतात. अनेक वेळा हे वाद हाणामारी शिवीगाळ इथपर्यंत येऊन चिघळतात. परंतु वसई येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई केली म्हणून याठिकाणी चालकाने आश्चर्यकारक पाऊल उचलले आहे.

‘या’ शेतकऱ्यांना मिळाले विहिरीसाठी लाखोंचे अनुदान; यादी झाली जाहीर

वाहतुकीचे नियम तोडले म्हणून वाहतूक पोलिसांनी कारवाई केली, म्हणून वसई ( Vasai) मध्ये चालकाने भर रस्त्यात बाईक पटवण्याचा प्रयत्न केला. हे चित्र पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी डोक्याला हात लावला आहे. वसईमधील गोखीवरे नाक्यावर ही घटना घडली आहे. यावेळी पोलिसांनी चालकाला अडवल्यामुळे अनर्थ टळला आहे. सुदैवाने याठिकाणी कोणीही जखमी झालेले नाही.

“…अन् आई वडीलांसमोर लहान मुलाने सोडला जीव”, वादळीवाऱ्यात लेकराने गमावला जीव

दुचाकी ( Bike) पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाचे नाव भानुप्रताप पांडे असे आहे. गोखीवरे येथे गाड्यांची तपासणी करत असताना वाहतूक पोलिसांच्या लक्षात आले की, पांडे यांच्या गाडीचे पियुसी न्हवते. तसेच विमा सुद्धा संपला होता. एवढंच नाही तर पांडे यांच्या गाडीचा नंबर सुद्धा खूप फॅन्सी ( Fancy number plate) होता.

Gautami Patil । गौतमीचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या मुलाचे वय पाहून पोलिसांनाही बसला धक्का!

दरम्यान पांडे यांनी दंड ( Penalty) भरण्यास नकार दिल्याने वाहतूक पोलिसांनी दुचाकी जप्त केली. मात्र संतप्त पांडे यांनी मोटारसायकलच्या पेट्रोलची टाकी उघडून ती पेटवली. मात्र वाहतूक पोलिसांनी आजूबाजूच्या नागरिकांची मदत घेऊन आग विझवली. यामुळे पुढचा अनर्थ टळला. या प्रकरणी पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sharad Pawar । शरद पवारांच्या निर्णयाने पक्षातील इतर नेते नाराज; पक्षामध्ये अंतर्गत कलह सुरू होणार?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *