Site icon e लोकहित | Marathi News

Indapur: इंदापुरात बंदुकीच्या धाकावर चोरट्यांनी लुटले 3 कोटी 60 लाख, पोलिसांत फिर्याद दाखल

Thieves robbed 3 crore 60 lakh at gunpoint in Indapur, complaint filed with police

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून (Pune Solapur Highway) एक धक्कादयक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापुर (Indapur) तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे एका स्कॉर्पिओ गाडीवर काही लोकांनी अचानक गोळीबार (shoot)केला. फक्त गोळीबारच नाही तर हल्लेकरांनी 3 कोटी 60 लाख रुपये रोख आणि तीन मोबाईल घेऊन पळ काढला. ही घटना शुक्रवार, 26 ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली. संदर्भात गाडीचे ड्रायव्हर भावेशकुमार अमृत पटेल (bhavesh Kumar patel)आणि पी.विजय कंपनीने इंदापूर (Indapur police station) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलिसांची पाच पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले.लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.पण पटेल यांच्याकडे एवढी रक्कम कोठून आली. ते कोठे निघाले होते. याबाबत अद्यापर्यंत कोणीतीही माहिती मिळाली नाही.

नेमकी घटना कशी घडली?

मेहसाणा गुजरात येथील रहिवासी ४० वर्षीय भावेशकुमार अमृत पटेल यांनी इंदापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.फिर्यादीत त्यांनी म्हटल आहे की, ते शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून वरकुटे गावच्या हद्दीत जात होते.यावेळी मारूती सुझुकी कंपनीची फोर व्हिलर स्विफ्ट गाडी आणि टाटा कंपनीच्या गाडीने पटेल यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला.

यादरम्यान स्पीड ब्रेकरवर कारचा वेग कमी झाला असता चार जणांनी त्यांची कार थांबविण्याचा प्रयत्न केला.गाडीचा वेग वाढल्यावर इतर काही गाड्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.गाडी न थांबल्याने त्याने पिस्तुलाने गोळीबार करत स्कॉर्पिओ थांबवली.याचवेळी मागून येणाऱ्या दोन कारमधील चौघांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.दोन चोरट्यांनी कारमधून 3 कोटी 60 लाख रुपये रोख आणि तीन मोबाईल घेऊन पळ काढला.

Spread the love
Exit mobile version