आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातला शेतकरी शेतीसह त्याला पूरक व्यवसाय (Business) म्हणून पशुपालन (animal husbandry) करत असतात. मग यामध्ये गाय-म्हशी पालन, कुकुटपलन आणि शेळीपालन (Goat rearing) प्रामुख्याने करत असतात. दरम्यान आजच्या काळात शेळीपालन हे कमाईचे उत्तम साधन आहे. यविशेष म्हणजे शेळीपालनातून अनेक लोक आज चांगला पैसा कमवत (making money) आहेत. जर तुम्हीदेखील हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय? तर शेळीपालन हा व्यवसाय तुमच्यासाठी एकदम चांगला पर्याय ठरू शकतो. या व्यवसायासाठी सरकार (government) तुम्हाला कर्ज (loan) देण्यास मदत करते.
मोठी दुर्घटना! मुंबईतील गिरगावमधील गोदामात आग लागून १४ गाड्या जळून खाक
अशा पद्धतीने मिळेल कर्ज
जर तुम्ही शेळीपालन व्यवसाय सुरू करत आहेत आणि तुम्हाला १० शेळ्यांवर बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे. मग यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाव लागेल. त्यानंतर तुम्हाला शेळीपालन योजना २०२२ अंतर्गत १० शेळ्यांवर ४,००,००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. महत्वाची बाब म्हणजे कर्जाची ही रक्कम कोणतीही सरकारी बँक, खाजगी बँक, स्मॉल फायनान्स बँक किंवा फायनान्स कंपनी मधून देखील मिळवू शकता.
खुशखबर! आता आधार कार्डद्वारे देशभरात कुठेही घेता येणार रेशन कार्डवरील धान्य, वाचा सविस्तर माहिती
कर्जासाठी असा करावा अर्ज
1) सर्वप्रथम तुम्हाला शेळीपालनासाठी प्रथम तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेला भेट देऊन शेळीपालन कर्जासाठी अर्ज करावा लागेल.
2) बँकेत तुम्हाला तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे आणि गोट फार्मशी संबंधित माहिती द्यावी लागेल.
3) तसेच अर्जदाराचे आधार कार्ड, रेशनकार्ड, वीज बिलाची छायाप्रत, शेळी फार्मचा प्रकल्प अहवाल, पासपोर्ट आकाराचा फोटो,किमान ६ ते ९ महिन्यांसाठी बँक स्टेटमेंट इ.देणे आवश्यक आहे.
4) तुमच्या फॉर्मची पडताळणी केल्यानंतर तसेच प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर कर्ज मंजूर होईल.
नेमकं मुरघासाचे फायदे आणि तोटे कोणते? वाचा याबद्दल साविसर माहिती